बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत असल्याचा खुलासा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केला आहे. बँकेचे व्यवहार सी.टी.एस. प्रणालीद्वारे होतात. त्यामुळे या बनावट धनादेशाची तपासणी संबंधित बँकांच्या अधिकारी/कर्मचारी यांनी योग्य प्रकारे केली नसल्याचे … Read more

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले!

नांदेड दि. २४ : आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. पोलीस परेड ग्राउंडवर मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नव मतदारांनी रिले स्पर्धेत भाग घेतला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा स्वीप कक्षाने मतदान तरुण युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व वाढावे, … Read more

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. … Read more

स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने पोलिसांच्या मदतीने काटेकोरपणे वाहन तपासणी करावी – मुंबई शहर जिल्ह्याचे आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन यांचे निर्देश

मुंबई, दि. 24 : स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने (SST) वाहन तपासणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, वाहनतपासणी दरम्यान रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू व शस्त्रसाठा पोलिसांच्या मदतीने तपासावा. संपूर्ण तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामकाजावर निरीक्षक (खर्च) देखरेख ठेवणार आहे. तसेच वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमने सतर्क राहून त्यांनी त्यांच्या … Read more

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

मुंबई, दि. २४ : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा … Read more

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. मुंबई उपनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री. … Read more

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sindhu2 1024x684 g4MLDj मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग दि.24 (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी किशारे तावडे यांच्या संकल्पनेतून  SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वीप’ अंतर्गत मालवण … Read more

मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र              मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात  मतदान प्रक्रिया पार पडली आहे. … Read more

‘दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. २४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. … Read more

मतदार जागरुकतेसाठी प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन

मुंबई, दि. २४ : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी स्वीप (SVEEP) अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत नुकतेच भायखळा विधानसभा मतदार संघात दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण … Read more

आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

WhatsApp Image 2024 04 23 at 8.47.49 PM 1 1024x768 आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

नांदेड दि. २३ : आम्ही ज्येष्ठ झालो आहोत. अनेकांना मतदान केंद्रापर्यंत जाणेही शक्य नसते. मात्र अनुभवावरून सांगतो, लोकशाहीला मतदानाची संजीवनी हवी असते, त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाणार आहोत 26 एप्रिलला मतदान करणार आहोत, तरुणांनी मागे राहायला नको, असे आवाहन नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी तमाम जिल्हावाशियांना केले आहे. आपले मतदान हे आपला पाठिंबा. आपला विरोध. आपली तटस्थता. … Read more

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर

मुंबई, दि. २३:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यातर्फेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीउमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या छाननीसाठी मानक दरसूची जाहीर केली आहे. यामानक दरसूचीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, छायाचित्रण करणे (Videography), झेरॉक्स, खुर्च्या, मंडप, ध्वनीक्षेपक यंत्रणा, संगणक, प्रिंटर, खानपान, पोस्टर/बॅनर, हँड बिल, पत्रक (Pamplet), होर्डिंग, कटआउट, कमान उभारणे, हॉटेल/गेस्ट … Read more

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे सायकल रॅली              

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी … Read more

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा … Read more

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 23 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात साडेपाचशेहून अधिक पथके अहोरात्र 24×7 असे काम करीत आहेत. लोकसभेच्या चारही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर … Read more