अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमएचटी सीईटी व जेईईच्या स्कोअरवर नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

राज्य सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून खुलासा

मुंबई, दि. ७ राज्य  सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून  एमएचटी- सीईटी व जेईईच्या स्कोअरवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे,  असा खुलासा राज्य सामाईक प्रवेश कक्ष (सीईटी सेल) कडून करण्यात आला आहे.

‘अभियांत्रिकी प्रवेशात सीट ब्लॉकिंग होण्याशी शक्यता,’ असे वृत्त प्रसिद्ध झाले यामध्ये तथ्य नाही असे राज्य सामाईक प्रवेश कक्ष यांच्याकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

उमेदवाराचे शैक्षणिक हित लक्षात घेता, जे उमेदवार जेईई ही सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली असेल तर तो अखिल भारतीय कोटाकरीता  भारतातील विविध राज्यात प्रवेशास पात्र असतो. जर उमेदवारांनी एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा दिली असेल तर उमेदवाराला महाराष्ट्रातील विविध राज्यामध्ये एकाधिक संस्थांची निवड करु शकतो. वरील दोन्ही परीक्षा दिली असेल तर भारतातील विविध संस्थामध्ये प्रवेश घेण्यास  व संबंधित राज्याच्या परीक्षा दिली असेल तर राज्यातील संस्थामध्ये प्रवेश घेण्यास पात्र असतो.

प्रवेश प्रकियेकरीता ऑनलाईन नोंदणी अर्ज कराताना सर्वप्रथम उमेदवारांची प्राथमिक माहिती भरुन घेतली जाते. उदा. बारावीच्या प्रमाणपत्रामध्ये नाव नमूद तसेच नाव नोंदणी करणे, ई-मेल आयडी, मोबाईल आणि पासवर्ड तयार करणे इ.

सदरील प्राथमिक माहिती भरुन झाल्यानंतर सत्यापन करण्यासाठी उमेदवारांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर सत्यापन कोड देण्यात येतो. त्यानंतर सदरील ऑनलाईन नोंदणी अर्ज सत्यापन होतो. त्यानंतर उमेदवारांचे कागदपत्राची छाननी करण्याकरीता उमेदवाराला ई-पडताळणी केंद्र आणि उमेदवार प्रत्यक्षात सुविधा केंद्रावर जाऊन पडताळणी करुन घेणे अनिवार्य असते. त्यानंतर सदरील उमेदवाराचे नाव गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यात येऊन गुणवत्ता यादी जाहीर केली जाते.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरीता एकाधिक संस्थांची निवड करण्यासाठी विकल्प अर्ज करण्यात येतो. त्यानंतर गुणवत्ता क्रमांक नुसार प्रवेश करण्यात येतो.

००००