आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र

मुंबई, दि. २६ : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे.

राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील. १२ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल.

विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय शॅडो मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे :

.क्र
जिल्हयाचे नाव
शॅडो मतदान केंद्राची संख्या


अहमदनगर
२२


अमरावती
७३


औरंगाबाद
०९


बीड
२२


भंडारा
०२


बुलढाणा
०७


चंद्रपूर
४१


धुळे
१६


गडचिरोली
४९

१०
गोंदिया
३३

११
जळगाव
१६

१२
कोल्हापूर
१७

१३
नागपूर
०४

१४
नांदेड
१२

१५
नंदूरबार
६९

१६
नाशिक
१०२

१७
पुणे
३८

१८
रायगड
४६

१९
रत्नागिरी
२३२

२०
सांगली
०१

२१
सातारा
३१

२२
सिंधुदुर्ग
६०

२३
वर्धा
०२

२४
यवतमाळ
११

 
एकूण
९१५

 

0000

 

 

The post आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र first appeared on महासंवाद.