आधी मराठा आरक्षण मगच भरती ; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय कोणतीही भरती करु नका, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकत संभाजी राजेंनी ही मागणी केली आहे.

“आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13 टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.