आमदार सरोज अहिरेंच्या बाळाला घेऊनच आरोग्यमंत्री पोहोचले हिरकणी कक्षात
मुंबई : काल देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ५ महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता त्यांना हिरकणी कक्षात ज्या असुविधाना तोंड द्यावे लागले. त्या संदर्भात त्यांना आरोग्यमंत्र्यांना येत्या २४ तासात सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे आज विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड – पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज ताई व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला.
कक्षात केलेल्या व्यवस्थे बद्दल सरोजताई यांचे समाधान झाले व त्यांनी एवढ्या तत्परतेने तक्रारीची दखल घेत स्वतः जातीनिशी तक्रार निवारण केल्या बद्दल आरोग्यमंत्री मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त केले.
आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महीला पोलिसांसाठी असे हिरकणी कक्ष येत्या काळात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी
- Job Opportunity | रोग कल्याण समिती यांच्यामार्फत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
- Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | गेल (GAIL) इंडिया लिमिटेडमध्ये ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य
Comments are closed.