‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई दि. २२ : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपये, निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये, टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, पर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपये, गील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपये, यांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपये, शोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्च‍ित करण्यात आलेला आहे.

राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

श्रध्दा मेश्राम/स.सं