कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, दि. १२ : लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून कुलाबा मतदारसंघातील मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी येथे केले.

%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8 2 कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

बायव्ह्यू मरीना गार्डन, कफ परेड येथे आयोजित कुलाबा परिसरातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित खुल्या संवाद उपक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले की, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान होणार आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कुलाबा मतदारसंघाचा समावेश होता. राज्याच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात वेगळे स्थान असलेल्या कुलाबा सारख्या नामांकित ठिकाणातील मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करण्याचे काम करत आहे. राज्यात विविध मतदारसंघात जनजागृती उपक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी मतदान प्रक्रियेविषयी व्यापक आणि कृतीशील दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE %E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0 %E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8 3 कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे म्हणून मतदार यादी संकेतस्थळावर तसेच वोटर ॲपवर उपलब्ध आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उंच इमारती व गृहसंकुलांसाठी १,१८५ मतदान केंद्रे, वाहनतळ सुविधा, तसेच दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्रांची सुविधा दिली आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेत, मतदारांनी मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

 

The post कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी first appeared on महासंवाद.