क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि ३ : मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजू नवघरे, कृषीभूषण गोविंदराव पवार, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील, कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

प्रवीण भुरके /स.सं