गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. ८ : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढी पाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड  म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००