गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. १ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने दुपारी आगमन झाले.

श्री. शहा यांचे स्वागत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच  राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

येथून गृहमंत्री अमित शहा यांनी योगी सभागृह, दादर येथे पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

०००००