‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहुराज माळी यांची आज मुलाखत

मुंबई, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’  कार्यक्रमात ‘उष्माघात उपाययोजना’ याविषयी राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक लहुराज माळी यांची आज बुधवार दि.10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

उष्णतेच्या लाटा आपत्तीपूर्व नियोजन, उष्माघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती श्री.माळी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवर हा कार्यक्रम पाहता येईल.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

संध्या गरवारे/ ससं/