जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत २४ लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त

जळगांव दि. ११ (जिमाका) जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू केली आहे.

शस्त्र जप्ती

जिल्ह्यात एकूण 1323 परवानाधारक शस्त्र असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश जारी झाल्यानंतर आज पर्यंत 985 शस्त्र विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. तर 115 शस्त्रधारकांना सूट देण्यात आली आहे. चार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आले आहेत. अद्याप पर्यंत 27 शस्त्र जमा होणे बाकी आहे. सीआरपीसीच्या प्रतिबंधात्मक कलमा अंतर्गत आतापर्यंत 4700 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत तर 3287 जणांना अटक करण्यात आली आहे.

मद्य संदर्भातील कार्यवाही

आचासंहिता (16मार्च पासून) कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल खालीलप्रमाणे

एकूण गुन्हे – 136
जप्त मुद्देमाल (लिटर)- 49,252.19
जप्त मुद्देमाल किंमत (रू) – 24,08,865

CVIGIL

जळगाव जिल्ह्यात एकूण 66 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी सत्यता पडताळून 12 तक्रारी वगळण्यात आल्या तर 54 तक्रारीवर विहित काळात कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील अँपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत   त्यावर कार्यवाही होते.

मीडिया

अद्याप पर्यंत मीडिया सेल कडे एकूण दोन तक्रारी प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी दोन्ही तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

०००