ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे,दि. १४(जिमाका): महाराष्ट्रातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

WhatsApp Image 2024 11 14 at 122047 PM ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

मतदारांचा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील वाहने, संस्था आणि एजन्सीद्वारे सायरनचा वापर करण्यात आला होता. नियोजित वेळेत सामूहिक संकल्प उपक्रमात सामील होण्यासाठी सायरनने शासकीय कार्यालयात, खाजगी आस्थापनांमध्ये व सार्वजनिक ‍ठिकाणी असलेल्या नागरिकांना या सामूहिक प्रतिज्ञा उपक्रमात सहभागी होण्याची आठवण करुन दिली.  सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी सायरन वाजल्यानंतर 11.00 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील उत्साही मतदार, नवमतदार विद्यार्थ्यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

WhatsApp Image 2024 11 14 at 122047 PM 1 ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त व इतर सर्व पोलीस अधिकारी/ कर्मचारी, सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व त्यांचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे जिल्हा परिषद कार्यालय व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सर्व महापालिका शाळा, खाजगी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीची तसेच मतदान अधिकार बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.

WhatsApp Image 2024 11 14 at 115911 AM ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सामूहिक शपथ घेण्यात आली. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ, प्रशिक्षण हॉल, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गांधार नगर, खडकपाडा त्याचप्रमाणे विविध शाळा, शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी देखील मतदानाची शपथ घेवून मतदान जनजागृती करण्यात आली.

WhatsApp Image 2024 11 14 at 114201 AM ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

139 मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. 140-अंबरनाथ (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रात, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातही सामूहिक शपथ घेण्यात आली. 142 कल्याण पूर्वमधील सर्व शाळा, महाविद्यालये, प्रभागक्षेत्र कार्यालय, शासकिय कार्यालये, विविध गृहनिर्माण संकुले यामध्ये देखील मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली व मतदान प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात लाऊडस्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत व संदेश वाजवून नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

WhatsApp Image 2024 11 14 at 115328 AM ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स.वा.जोशी विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे मतदार जनजागृतीची सामूहीक शपथ घेण्यात आली. 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विविध शासकीय कार्यालये, मनपा कायालये, गृहनिर्माण संस्था, निवडणूक कार्यालये तसेच 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ परिक्षेत्रातील विवियाना मॉल, मनपा कायालये, गृह निर्माण संस्था, निवडणूक कार्यालये इ. ठिकाणी, त्याचबरोबर 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील आय टी आय वर्कशॉप-1, वागळे इस्टेट, परबवाडी ठामपा शाळा क्रमांक १८ येथे मतदान शपथ घेण्यात आली.

WhatsApp Image 2024 11 14 at 125633 PM scaled ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा

148 विधानसभा मतददारसंघात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थी, ठाणेकर नागरिक यांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ स्वीप समितीमार्फत ठाणे महानगर पालिका माध्यमिक शाळा क्र. 11, 13, 14, 75, 118 या ठिकाणीही मतदानाची शपथ देण्यात आली.

०००

The post ठाणेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतली मतदान करण्याची प्रतिज्ञा first appeared on महासंवाद.