तळा आणि म्हसळा नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार करावा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 13 : रायगड जिल्ह्यातील तळा आणि म्हसळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा आराखडा तातडीने तयार करून इमारतीच्या कामाला गती द्यावी, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील तळा आणि म्हसळा नगरपंचायत प्रशासकीय इमारती संदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तळा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विराज लबडे, म्हसळा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी विठ्ठल राठोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

तळा आणि म्हसळा या दोन्ही नगरपंचायत इमारत कार्यालयासाठी जागा तसेच निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आराखडा तयार करून यामध्ये लोकांसाठी सोयी सुविधांचा समावेश करावा. पिण्याचे पाणी, टॉयलेट, सौर ऊर्जा या सुविधांचा समावेश करून आराखडा तयार करावा, अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/