विविधतेने नटेलेला असा आपला भारत देश आहे. भारतात तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाविकांनी गजबजलेली प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे पाहायला मिळतात. राज्यासह देशात असे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्यांचे या तीर्थक्षेत्रांना आयुष्यात एकदा तरी भेट देता यावी असे स्वप्न असते. पण अनेकदा गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे तसेच कुणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशा माहितीच्या अभावाने तिथे जाता येत नाही. परंतु आता अशा ज्येष्ठ नागरिकांना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. काही ज्येष्ठ नागरिक आर्थिक, शारीरिक परिस्थितीमुळे त्यांची तीर्थक्षेत्रांना जाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ महाराष्ट्रातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्ष व त्यावरील नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे.
हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांची मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेमध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
योजना सुरू करण्यामागचा मानस
राज्यातील सर्व धर्मातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाण्याची इच्छा पूर्ण व्हावी. यासाठी त्यांना राज्यातील आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे.
योजनेत कोणत्या स्थळांचा समावेश
या योजनेमध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील सिद्धीविनायक, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च;आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश आहे.तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदीर, अमरनाथ गुहा, अमृतसरमधील सुवर्ण मंदीर, अयोध्येतील श्रीराम मंदीर, वेरावळमधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश होतो. याशिवाय तामिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, झारखंड, आंध्रप्रदेश, आसाम, ओरीसा, झारखंड, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि काश्मिर आणि कर्नाटक या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतील 15 धार्मिक स्थळंही या यादीत आहेत. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा केवळ एक वेळच लाभ घेता येईल.
या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार रुपये इतकी असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक तसेच
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अपात्र कोण ठरणार?
कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार नसावेत. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नसावेत. चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे. प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी. अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही
0000