दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुकेश जैन खर्च निरीक्षक

मुंबई, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील ३१ – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून मुकेश जैन (आयआरएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.जैन यांचा निवासाचा पत्ता सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथील कक्ष क्रमांक २०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३२४८५८३२८ आणि ई-मेल आयडी 31mscexpenditureobserver@gmail.com हा आहे. तसेच निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सुदाम काठे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९९६७८१९७५७ हा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक श्री.जैन यांना सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई  येथे उमेदवारांना भेटण्याची वेळ दुपारी २ ते ४ वा. तर नागरिकांनी भेटण्याची वेळ  दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत असणार आहे.

००००