‘दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. २४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

अमरावती जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माहिती दिली आहे.

००००