‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत                        

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची ‘कायदा व सुव्यवस्था या विषयावर शुक्रवार दि.३ मे २०२४ आणि शनिवार दि.४ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके  यांनी घेतली आहे.

लातूर जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था याबाबत पुर्वतयारी कशा पद्धतीने केली आहे याविषयी दिलखुलास‘ कार्यक्रमातून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी माहिती दिली आहे.

तर जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.३ मे २०२४ सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR