जय महाराष्ट्र कार्यक्रमात १७ सप्टेंबरला मुलाखतीचे प्रसारण
मुंबई, दि.12: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची तयारी’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु असून मुंबईतील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव आनंदात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येते. मंगळवार 17 सप्टेंबर, 2024 रोजी अनंत चतुर्दशी दिनी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली तयारी यासंदर्भातील माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. सपकाळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार, दि. 13 आणि शनिवार दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
—000—
केशव करंदीकर/व.स.सं.