‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात मतदार जनजागृती‘ या विषयासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांची घेतलेली मुलाखत बुधवार दि. १७  एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत भंडारा  जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ – दांदळे यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूररामटेकचंद्रपूरगडचिरोलीभंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे.यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा  जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयीची माहिती दिलखुलास‘ कार्यक्रमातून स्विपचे नोडल अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांनी दिली आहे.

0000