नवभारत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक विनोद माहेश्वरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 12 :- “नवभारत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक विनोद माहेश्वरी यांचे निधन ही महाराष्ट्राच्या वृत्तपत्र, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने निर्भीड, निष्पक्ष, लोकाभिमुख पत्रकारितेचा आदर्श हरपला आहे. त्यांचे वडील महान स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय रामगोपाल माहेश्वरी यांनी सुरू केलेल्या नवभारत वृत्तपत्राला प्रतिष्ठा, लोकप्रियता,  विश्वासार्हता मिळवून दिली. वडिलांकडून मिळालेला देशभक्तीच्या विचारांचा वारसा सन्माननीय विनोदबाबूंनी यशस्वीपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या, देशाच्या वृत्तपत्र चळवळीला नवी दिशा आणि उंची प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. विनोदबाबू माहेश्वरी यांच्या कुटुंबीयांच्या, नवभारत वृत्तपत्रसमूह परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी स्वर्गीय विनोदबाबूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोदबाबू माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

—००००—-