नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

ठाणे, दि. ११ : नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, 10 बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा 410 कोटीहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले. पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, आता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहे, अशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात विविध नागरी सुविधा, प्रकल्प यांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

यावेळी सिडकोचे अध्यक्ष श्री.संजय शिरसाट, खासदार श्री.श्रीरंग बारणे, खासदार श्री.नरेश म्हस्के, आमदार श्री.गणेश नाईक, आमदार श्री.निरंजन डावखरे, आमदार श्रीम.मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक श्री. विजय सिंघल, ‘नमुंमपा’ आयुक्त डॉ.कैलास शिंदे, केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या वस्त्र समितीच्या आयुक्त तथा उपाध्यक्ष श्रीम. रुप राशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

माझी लाडकी बहीण योजनेत नवी मुंबईतील 1 लाख 45 हजारहून अधिक महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून नवी मुंबईत चांगले काम झाल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिप्राय दिला. यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांचे लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेचा लाभ देण्यात आला तसेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत परिसर सखी वस्ती संघामधील 10 महिला वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहनाची चावी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

त्याचप्रमाणे ‘नमुंमपा’ परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50% म्हणजे हाफ तिकीटात प्रवास करता येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री यप्रसंगी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा करताच कार्यक्रमास उपस्थित महिलांनी टाळयांचा गजर केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षी दिवाळीला 30 हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते. यावर्षी त्यामध्ये 3 हजाराची भरीव वाढ करीत 33 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यांनी जाहीर केले.

आमदार श्री.गणेश नाईक व आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी मनोगतात नागरिकांकरिता महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहरातील नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या व त्यांना अधिक सुविधा देणाऱ्या दर्जेदार कामांची पूर्तता महानगरपालिका करीत असून त्यामधील 25 महत्वाच्या सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकर नागरिकांना महत्वाच्या सेवासुविधांची भेट देण्यात आली असून यामध्ये घणसोली कोपरखैरणे जंक्शन ते साईबाबा मंदिर सर्कल पर्यंत जोडणाऱ्या घणसोली पामबीच रस्त्याचे काँक्रिटीकरण, पावसाळी गटार व पदपथ बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ (रू. 52 कोटी 50 लक्ष),

सेक्टर 19 ए, कोपरखैरणे येथे भूखंड क्र. के-66 व के-67 येथे बहुउद्देशीय इमारत भूमिपूजन समारंभ (54 कोटी 29 लक्ष),

सेक्टर 12, वाशी येथे एनएमएमटी बस स्थानक, 50 X 25 ऑलिम्पिक साईज जलतरण तलाव लोकार्पण समारंभ (191 कोटी 76 लक्ष)

सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे बहुमजली वाहनतळ इमारत लोकार्पण समारंभ (34 कोटी 63 लक्ष)

नेरूळ विभाग कार्यालय इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 36 लक्ष)

कुकशेत येथे शाळा इमारत लोकार्पण समारंभ (6 कोटी 26 लक्ष)

वाशी सेक्टर 15 व 9 येथे कोपरखैरणे लिंक रोडवरील पादचारी पूल (FOB) लोकार्पण समारंभ (2 कोटी 44 लक्ष)

प्लॉट क्र. 14, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (4 कोटी 60 लक्ष)

प्लॉट क्र. 16, कुकशेत येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (9 कोटी 37 लक्ष)

सेक्टर 15, कोपरखैरणे येथील मार्केट इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 17 लक्ष)

सेक्टर 22 नेरूळ येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 53 लक्ष)

सेक्टर 9 सीबीडी बेलापूर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 48 लक्ष)

घणसोली वाल्मिकीनगर येथील जलकुंभ लोकार्पण समारंभ (8 कोटी 21 लक्ष)

सेक्टर 8 वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (7 कोटी 85 लक्ष)

सेक्टर 15/16 वाशी येथील जलकुंभ भूमिपूजन समारंभ (14 कोटी 16 लक्ष )

सेक्टर 16, कोपरखैरणे येथे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इमारत लोकार्पण समारंभ (2 कोटी 28 लक्ष)

नमुंमपा रूग्णालयांमध्ये 6 आधुनिक शस्त्रक्रियागृह सुविधा (Modular O.T.) लोकार्पण समारंभ

13 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात कॅन्सर स्क्रिनींग सुविधा शुभारंभ

कॅन्सर रूग्णांसाठी नेरुळ रुग्णालयात 10 बेड्सची केमोथेरपी सुविधा शुभारंभ

शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (UHWC) शुभारंभ

टेक्सटाईल टू रिसायकल प्रकल्प शुभारंभ

25 ई बसेस सुविधा शुभारंभ

ई वाहनांसाठी 18 चार्जींग स्टेशन बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ

नमुंमपा कामकाजात ई ऑफिस प्रणाली शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिकेचे नुतन ॲप mynmmc शुभारंभ,

अशा विविध नागरी सुविधा कामांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शाळा इमारती, पर्यावरण व घनकचरा व्यवस्थापन विषयक सुविधा व प्रकल्प तसेच प्रशासकीय सेवा या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या दृष्टीनेही सेवांचा आरंभ करण्यात आला.

०००

The post नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन first appeared on महासंवाद.