मुंबई, दि. 1- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.
डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे.”