नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वित : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दिनांक 3 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानात झालेल्या तूटीमुळे उपलब्ध असलेल्या भुजलसाठा घटला आहे. यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई व दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या टंचाई नियंत्रण कक्षाचा 0253-2317151 हा दूरध्वनी क्रमांक असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

000000