नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली, 12 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज परिवहन भवन येथे केंद्रीय मंत्री पदाचा पदभार आज स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळात ही जबाबदारी पुन्हा देण्यात आल्याबद्दल श्री.गडकरी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. गडकरींनी आपल्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना, संपूर्ण देशात सुरक्षित आणि वेगवान रस्ते वाहतूक प्रणाली उभारण्याचा तसेच भारतातील पायाभूत सुविधांना जागतिक दर्जाचे करण्याचा संकल्प व्यक्त केला.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा पदभार पीयूष गोयल यांनी स्वीकारला. श्री.गोयल यांनी मोदी सरकारच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, युवकांसाठी नवीन संधी निर्माण करणे व सर्व नागरिकांच्या हितासाठी कार्य करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

0000000000000