निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

जळगाव दि. 15 ( मीडिया कक्ष ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. चांगले नियोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. यावेळी सर्वसाधारण निरीक्षक राजेशकुमार (आय.ए.एस),भुसावळ, जळगाव शहर, सर्वसाधारण निरीक्षक रणजित कुमार सिन्हा (आय.ए.एस) जळगाव ग्रामीण, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

98ed51ca 1402 4494 a784 d672ecf9bab8 निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक अरुणकुमार (आय.ए.एस) चोपडा, रावेर, सर्वसाधारण निरीक्षक ब्रजेश कुमार (आय.ए.एस) एरंडोल, चाळीसगाव, सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (आय.ए.एस) पाचोरा,जामनेर,
मुक्ताईनगर, पोलीस निवडणूक निरीक्षक तौहिद परवेझ (आय.पी.एस) सर्व 11 मतदार संघ, खर्च निरीक्षक हरकेश मीना (आय. आर.ए.एस) चोपडा, रावेर, भुसावळ,जळगाव शहर, जळगाव ग्रामीण,  खर्च निरीक्षक रोहित इंदोरा (आय. आर.एस) (सी. अॅण्ड सी.ई)अमळनेर,एरंडोल,चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर हे उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी,नोडल अधिकारी, 11 विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

e03a2eac 12e1 4a7f ac2b 18689493ea39 निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील याबाबत खात्री करून घ्यावी, जिथे सुविधा कमी आहेत, तिथे सुविधा पुरवाव्यात. कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक दक्ष राहावे असे सांगून मतदानाचा टक्का अधिक वाढेल यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केल्या.

यावेळी सर्व सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक यांनीही सर्व निवडणूक यंत्रणेवर आमचे लक्ष असल्याचे सांगून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे निवडणूक प्रशासन काम करत असल्याचे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 11 विधानसभा मतदार संघतील पूर्व तयारीचे सादरीकरण केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी, आता पर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती दिली.

00000

The post निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा first appeared on महासंवाद.