निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी हे २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल

ठाणे, दि. 27 (जिमाका) : 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी श्री. चित्तरंजन धंगडा माझी (IRS) यांची निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत ‍निवडणूक आयेगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. श्री. चित्तरंजन धंगडा माझी हे भारतीय महसूल सेवेतील 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

23-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उप विभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यांचे मतदारसंघातील संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. चित्तरंजन धंगडा माझी (आयआरएस) यांचा संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून 23.bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा इमेल पत्ता आहे.

0000