पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला मुंबईत आयोजन

मुंबई, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या  रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर “Pandit Dindayal Upadhyay Job Fair” ऑप्शनवर क्लिक करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/