पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण…
सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे, हे विशेष आमंत्रण घेऊन मी राजन पाटलांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलो आहे” असे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय विश्वात मोठा धमाका उडवून दिला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील हेवी वेट नेते आहेत. या मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत असून गेल्या तीस वर्षांपासून हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीचे बडे बडे नेते मोदी लाटेत पराभूत होत असताना राजन पाटलांनी मात्र मोहोळचा गड राखलाच नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना मोठे मताधिक्य देऊन या मतदारसंघात कोणत्याही लाटेचा प्रभाव होणार नसल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे सहाजिकच अनगरकर पाटलांच्या राजकीय करिष्म्याची दखल सर्वपक्षीय नेते मंडळींनी घेतलेली आहे.
काही वर्षांपासून राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही चिरंजिवांची राष्ट्रवादीच्याच पक्ष श्रेष्ठींकडून कोंडी केली जात असल्याने त्यांच्याच पक्षातील नरखेडच्या पाटलांना राजकीय बळ दिले जात आहे. त्यामुळेच अनगरकर पाटील पिता-पुत्र पक्ष श्रेष्ठींवर नाराज असून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे राजन पाटलांनी माढ्याचे आमदार बबन दादांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत घेतलेली भेट देखील चांगलीच गाजली.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवार २२ फेब्रुवारी रोजी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटी दरम्यान माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे, हे विशेष आमंत्रण घेऊन मी राजन पाटलांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलो आहे” असे सांगून राजकीय धमाका उडवून दिला. यावेळी युवा नेते बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेले. मात्र राजन पाटील हे भाजप प्रवेशाबाबत अध्याप पर्यंत खुलेपणाने बोलत नसले तरी त्यांचे कमळावर जडत चाललेले प्रेम आता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेपासून लपून राहिलेले नाही.
बाळराजे पाटलांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…
मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी आज आमच्या घरी भेट देऊन आदरातिथ्य स्वीकारले, पाटील परिवाराची आणि मोहोळ मतदार संघातील विकासकामांची माहीती घेत चर्चा, विचारपूस केली, आम्हा युवा पिढीस मार्गदर्शन केले तसेच या पुढील काळातही पाटील परिवाराशी असलेला स्नेह वृंधिगत होत राहील असे आश्वस्त केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आशा आशियाची पोस्ट व्हायरल झाल्याने अनगरकर पिता-पुत्र पिता पुत्र राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन कमळ हातात घेणार निश्चित मानले जात असून लवकरच पक्ष प्रवेशाची तारीख ठरण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधील व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीला पडणार खिंडार ?
माजी आमदार राजन पाटील हे सलग तीन टर्म आमदार होते त्यानंतर त्यांनी पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या तीन उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून राजकीय ताकद दाखवून दिलेली आहे. जर राजन पाटील राष्ट्रवादीतून भाजपात गेले तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Gulabraop Patil | “एकच पिक्चर बघून लोक बोअर झालीत, दुसरं काहीतरी वेगळं करा” गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
- Cucumber Benefits | त्वचा निरोगी राहण्यापासून ते वजन नियंत्रणात राहण्यापर्यंत ‘हे’ आहे रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार
- Sanjay Raut | “माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”; राऊतांचा गंभीर आरोप
- Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे
Comments are closed.