परवीनकुमार थिंड यांची मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती, संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

मुंबई उपनगरदि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली.

निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारी कार्यालयपाचवा मजलाप्रशासकीय इमारतसरकारी वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई – 400051. त्यांचा संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक (+)९१ ८९२८५७१२५३ असा आहे.

दरम्याननिवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारीसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीखर्च पथक प्रमुख  आदी उपस्थित होते.  या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, ETPBMS वेळापत्रकघरपोच मतदानपोस्टल बॅलेट मतदानमतदानाच्या तयारी आदी बाबतचा आढावा घेतला. खर्चाच्या दृष्टिकोनातून आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावीअशा सूचना देत त्यांनी मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

000