पारंपरिक ज्ञानाला व्यवसाय रूप देणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शक हरपल्या – उद्योजिका कमलताई परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 : कमलताई परदेशी यांच्या निधनाने पारंपरिक ज्ञानाला व्यवसाय रूप देणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शक हरपल्या अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, कमलताई यांनी महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग दाखविला. ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली. कष्ट , जिद्द आणि ध्यास याच्या जोरावर अंबिका मसाल्यांना देशभरातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

0000