पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

नंदुरबार, दिनांक 01 मे, 2024 (जिमाका वृत्त) महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त आज  पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

यांचा झाला गौरव…

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सुहास केशवराव गोसावी, यांना आदर्श तलाठी पुरस्काराचे प्रशस्तीपत्र व श्रीमती दिपमाला प्रकाश पाटील यांना पोलीस पाटील विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, गोविंद दाणेज, कल्पना निळ-ठंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख-कर्मचारी आदी उपस्थित होते.