पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण

धुळे, दिनांक 1 मे, 2024 (जिमाका वृत्त) :  महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक 6, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल ( पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड, श्वान पथक, फॉरेन्सिक व्हॅन, चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक आदी पथकांचे संचलन झाले. संचलनाचे नेतृत्व पोलीस निरिक्षक मुकेश माहुले यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या पूनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

000