पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी सुसंवाद

मुंबई, दि. 6 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर बुधवार 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. या प्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून महसूल विभागाशी संबंधित समस्या असलेल्या नागरिकांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे.

‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्याचप्रमाणे नागरिकांना हव्या असलेल्या दाखल्यांचे वितरण केले जाते. नागरिकांना येताना सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ