पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सातारा, दि. १ ( जि.मा.का.) महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डूड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशीनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे श्रीमती विजयादेवी शिवाजीराव देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वतंत्र सैनिक, विर माता, आजी-माजी सैनिक व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस, गृहरक्षक दल यांनी मानवंदना दिली.