सातारा दि. १४: फलटण बसस्थानक येथे मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते.
यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ७ ते सायं. ६ दरम्यान मतदान करण्यासाठी घराबाहेर पडून हक्क बाजवण्याबाबत आवाहन केले. जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटीसाठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच ‘मतदान कर 100 टक्के फलटणकर’ सांगून मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अहवान केले.
०००
The post फलटण बसस्थानकात मतदान जागर पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती first appeared on महासंवाद.