मुंबई, दि. २९: विधानसभा निवडणूक 2024 साठी विविध यंत्रणांकडील मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे.
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 15 प्रभागातील मनुष्यबळ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आले असून यामधील बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार आहेत, असेही निवडणूक शाखेने कळविले आहे.
०००
The post बृहन्मुंबई महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाहीत first appeared on महासंवाद.