बॉलिवूड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन, ‘या’ बड्या कलाकारांसोबत साकारली आहे भूमिका

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. ३ ऑगस्टच्या संध्याकाळी मिथिलेश यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. दरम्यानच्या काळात ते हृदयाच्या आजाराशी झुंज देत होते. मिथिलेश यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी त्यांच्या गावी हलवण्यात आले होते. याबाबत त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

मिथिलेश यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या आणि चांगल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सनी देओलच्या ‘गदर: एक प्रेम कथा’, मनोज बाजपेयीच्या ‘सत्या’, शाहरुख खानच्या ‘अशोका’सह ‘ताल’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘रेडी’मध्ये भूमिका साकारली आहे. पण ‘कोई… मिल गया’ या चित्रपटातील त्यांचे काम सर्वाधिक लोकप्रिय ठरले. या चित्रपटात त्यांनी हृतिक रोशनच्या संगणक शिक्षकाची भूमिका साकारली होती.

मिथिलेश त्या चित्रपटात शिक्षक बनले होते. रोहितला (हृतिक रोशन) त्याच्या वर्गातून बाहेर काढतात आणि वडिलांकडून संगणक शिकवून यायला सांगतात. हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयावर होते. मिथिलेश चतुर्वेदी यांचे हे निगेटिव्ह कॅरेक्टरही खूप आवडले होते. त्याच वेळी, रोहित (हृतिक) चा संगणक शिकल्यानंतर, चाहत्यांना त्याच्या शिक्षकाला दिलेले उत्तर देखील आवडले होते.

मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी तल्ली जोडी नावाच्या वेब सीरिजमध्ये काम मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. या मालिकेत त्याच्यासोबत मनिनी डे देखील दिसणार होती. मिथिलेश यांनी बॉलिवूड चित्रपटांसोबतच थिएटरमध्येही काम केले आहे. रंगभूमीवरील त्यांच्या योगदानाचेही खूप कौतुक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.