InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भोसरीतील सुसंस्कृत राजकारणाचा बुरखा फाटला; प्राध्यापक, शिक्षकाकडून मतदारांना ‘धनलाभ’

- Advertisement -

भोसरीच्या राजकारणातील कथित सुसंस्कृतपणाचा बुरखा फाडणारी धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे प्राध्यापक आणि शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘मी सुसंस्कृत राजकारणी’ असा प्रचार करणाऱ्या ‘अपक्ष’ उमेदवाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

Loading...

भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाला शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांनी साम- दाम- दंड आणि भेद या नीतीचा वापर करून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोप-प्रत्यारोप, अफवा आणि सोशल युद्ध सुरू असतानाच आता मतदारांना पैसे वाटप करतानाची घटना समोर आली.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रतिष्ठित कॉलेजचे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कॉलेज अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झालेले प्राध्यापक आणि शिक्षक लांडे यांच्या वतीने पैसे वाटप करीत होते का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.