मंत्री आदिती तटकरे यांना धाकटी बहीण म्हणून विभागातील महिलांनी बांधली आपुलकीची राखी

मुंबई, दि.18 : महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना राज्यात  प्रभावी राबविण्यात येत आहे.  महिला व बालविकास विभागातील महिलांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना धाकटी बहीण म्हणून आपुलकीची राखी बांधून अभिनंदन केले.

यावेळी मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ही योजना लाडक्या बहिणींसाठी मला महिला व बाल विकास मंत्री म्हणून राबविण्याची संधी मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. राज्यातील लहान, मोठ्या सर्व बहिणींसाठी त्यांच्या हक्काचा लाभ देता आला. एक महिला म्हणून मला अभिमान आणि आनंद आहे, असेही मंत्री  कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.