मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आवर्जून बजावावा – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

सुमारे २ कोटी ९ लाखांपेक्षा जास्त मतदार; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा
दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी ६२.७१ टक्के मतदान

मुंबई, दि. 3 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळवाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी 62.71 टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02, पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यासाठी एकूण २३ हजार ०३६  मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 1 मे पर्यंत 50,397 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1,110 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,595  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.    राज्यामध्ये दि. 1 मार्च ते  २ मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 49.95  कोटी रोख रक्कम तर 36.80 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 129.89 कोटी रुपये, ड्रग्ज 220.65 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३३,४६१ तक्रारी निकाली

16 मार्च ते 2 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारी

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
पुरूष मतदार
मतदान केलेले पुरूष मतदार
महिला मतदार
मतदान केलेल्या महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
मतदान केलेले तृतीयपंथी मतदार
एकूण मतदार टक्केवारी

1
05- बुलढाणा
933173
603525

(64.67%)

849503
502226

(59.12%)

24
10

(41.67%)

62.03%

2
06 – अकोला
977500

 

634116

(64.87%)

913269

 

534239

(58.50%)

45
11

(24.44%)

61.79%

 

3
07- अमरावती
944213

 

631920

(66.93%)

891780
537183

(60.24%)

85
18

(21.18%)

63.67%

 

4
08- वर्धा
858439

 

586780

(68.35%)

824318

 

504560

(61.21%)

14

 

9

(64.29%)

64.85%

 

5
14- यवतमाळ – वाशिम
1002400

 

655658

(65.41%)

938452

 

564508

(60.15%)

64

 

23

(35.94%)

62.87%

 

6
15 – हिंगोली
946674

 

628302

(66.37%)

871035

 

526647

(60.46%)

25

 

9

(36.00%)

63.54%

 

7
16 -नांदेड
955084

 

606482

(63.50%)

896617

 

522062

(58.23%)

142

 

20

(14.08%)

60.94%

 

8
17 -परभणी
1103891

 

717617

(65.01%)

1019132

 

604247

(59.29%)

33

 

4

(12.12%)

62.26%

 

 

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
मतदान केंद्रे
क्रिटिकल मतदान केंद्र
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या
बॅलेट युनिट (बीयु)
कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट

1
32-रायगड
2185
06
13
2185
2185
2185

2
35-बारामती
2516
03
38
7548
2516
2516

3
40-धाराशीव

(उस्मानाबाद)

2139
08
31
4278
2139
2139

4
41-लातूर
2125
16
28
4250
2125
2125

5
42-सोलापुर
1968
14
21
3936
1968
1968

6
43-माढा
2030
16
32
6090
2030
2030

7
44-सांगली
1830
06
20
3660
1830
1830

8
45-सातारा
2315
40
16
4630
2315
2315

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
1942
00
09
1942
1942
1942

10
47-कोल्हापुर
2156
03
23
4312
2156
2156

11
48-हातकणंगले
1830
02
27
3660
1830
1830

एकूण
23036
114
258
46491
23036
23,036

 

मतदारांची संख्या

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकुण
85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.

1
32-रायगड
8,20,605
8,47,763
4
16,68,372
3,146

2
35-बारामती
12,41,945
11,30,607
116
23,72,668
431

3
40-धाराशीव (उस्मानाबाद)
10,52,096
9,40,560
81
19,92,737
4,588

4
41-लातूर
10,35,376
9,41,605
61
19,77,042
2,566

5
42-सोलापुर
10,41,470
9,88,450
199
20,30,119
2,052

6
43-माढा
10,35,678
9,55,706
70
19,91,454
2,346

7
44-सांगली
9,53,024
9,15,026
124
18,68,174
1,859

8
45-सातारा
9,59,017
9,30,647
76
18,89,740
1,272

9
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
7,14,945
7,36,673
12
14,51,630
 

3,726

10
47-कोल्हापुर
9,84,734
9,51,578
91
19,36,403
3,103

11
48-हातकणंगले
9,25,851
8,88,331
95
18,14,277
1,122

एकूण
  1,07,64,741
  1,02,26,946
929
2,09,92,616
26,211

 

चौथ्या टप्पा :-

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी, 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 29.04.2024 असा होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
अंतिम उमेदवारांची  संख्या

1
01 नंदुरबार
11

2
03 जळगाव
14

3
04 रावेर
24

4
18 जालना
26

5
19 औरंगाबाद
37

6
33 मावळ
33

7
34 पुणे
35

8
36 शिरूर
32

9
37 अहमदनगर
25

10
38 शिर्डी
20

11
39 बीड
41

एकूण
298

 

चौथ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
पुरुष मतदार
महिला मतदार
तृतीयपंथी मतदार
एकुण
मतदान केंद्रे

1
01 नंदुरबार
9,92,971
9,77,329
27
19,70,327
2,115

2
03 जळगाव
10,37,350
9,56,611
85
19,94,046
1,982

3
04 रावेर
9,41,732
8,79,964
54
18,21,750
1,904

4
18 जालना
10,34,106
9,33,416
52
19,67,574
2,061

5
19 औरंगाबाद
10,77,809
9,81,773
128
20,59,710
2,040

6
33 मावळ
13,49,184
12,35,661
173
25,85,018
2,566

7
34 पुणे
10,57,870
10,03,082
324
20,61,276
2,018

8
36 शिरूर
13,36,820
12,02,679
203
25,39,702
2,509

9
37 अहमदनगर
10,32,946
9,48,801
119
19,81,866
2,026

10
38 शिर्डी
8,64,573
8,12,684
78
16,77,335
1,708

11
39 बीड
11,34,284
10,08,234
29
21,42,547
2,355

एकूण
1,18,59,645
1,09,40,234
1,272
2,28,01,151
23,284

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :- चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
2014 मधील मतदार संख्या
2019 मधील मतदार संख्या
2024 मधील मतदार संख्या

1
01 नंदुरबार
16,72,943
18,71,099
19,70,327

2
03 जळगाव
17,07,969
19,31,400
19,94,046

3
04 रावेर
15,93,389
17,75,051
18,21,750

4
18 जालना
16,12,056
18,67,220
19,67,574

5
19 औरंगाबाद
15,89,395
18,86,284
20,59,710

6
33 मावळ
19,53,741
22,98,080
25,85,018

7
34 पुणे
18,35,835
20,75,824
20,61,276

8
36 शिरूर
18,24,112
21,75,529
25,39,702

9
37 अहमदनगर
17,05,005
18,61,396
19,81,866

10
38 शिर्डी
14,62,267
15,87,079
16,77,335

11
39 बीड
17,92,652
20,45,405
21,42,547

 

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र
मतदार संघाचे नाव
18-19
20-29
30-39
40-49
50-59
60-69
70-79
80 +

1
01 नंदुरबार
33,195
4,44,318
4,42,554
4,12,872
2,99,440
1,97,118
98,708
42,122

2
03 जळगाव
28,173
3,85,412
4,48,921
4,53,736
3,13,022
2,03,452
1,09,828
51,502

3
04 रावेर
29,169
3,64,731
4,11,626
3,87,164
2,87,284
1,91,712
1,01,825
48,239

4
18 जालना
29,790
4,17,782
4,80,225
4,12,352
2,86,020
1,80,300
1,00,860
60,245

5
19 औरंगाबाद
34,075
4,19,432
5,11,470
4,39,843
3,20,650
1,81,684
98,509
54,047

6
33 मावळ
35,331
4,53,849
6,68,235
5,84,842
4,01,439
2,54,503
1,28,919
57,900

7
34 पुणे
21,951
2,80,253
4,63,845
4,74,038
3,54,180
2,40,169
1,49,663
77,177

8
36 शिरूर
32,081
4,52,025
6,67,012
5,74,166
3,75,316
2,36,420
1,34,244
68,438

9
37 अहमदनगर
27,536
3,67,609
4,24,428
4,19,620
3,16,909
2,20,450
1,33,393
71,921

10
38 शिर्डी
25,303
 3,36,888
3,69,136
3,53,420
2,70,905
1,76,561
96,858
48,264

11
39 बीड
25,011
4,30,572
5,06,935
4,52,586
3,15,725
2,09,883
1,28,144
73,691

          एकूण
3,21,615
43,52,871
53,94,387
49,64,639
35,40,890
22,92,252
12,80,951
6,53,546

 पाचवा टप्पा:-     लोकसभा निवडणूकीचा पाचव्या टप्प्याबाबतची माहिती :- पाचव्या टप्प्यात नाशिक  विभागातील 03 आणि कोकण विभागातील 10 अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

 

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
दिनांक 26.04.2024

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक
दिनांक 03.05.2024

नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांक
दिनांक 04.05.2024

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक
दिनांक 06.05.2024

मतदानाचा दिवस
दिनांक 20.05.2024

पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघात दि.02.05.2024 पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.

अ.क्र.
मतदार संघाचे नाव
उमेदवारांची  संख्या
नामनिर्देशनाची संख्या

1
02 धुळे
10
13

2
20 दिंडोरी
09
16

3
21 नाशिक
18
27

4
22 पालघर
11
13

5
23भिंवडी
15
16

6
24 कल्याण
15
23

7
25 ठाणे
14
17

8
26 मुंबई उत्तर
11
18

9
27 मुंबई उत्तर – पश्चिम
15
16

10
28 मुंबई उत्तर – पूर्व
20
24

11
29 मुंबई उत्तर – मध्य
13
14

12
30 मुंबई दक्षिण – मध्य
14
19

13
31 मुंबई दक्षिण
08
13

एकूण
173
229

 

 

००००