मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

ठाणे, दि. २६ (जिमाका) : हाजुरी येथील दर्गात मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणानंतर स्वीप पथकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा व मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून दिनांक 20 मे रोजी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

या उपक्रमास मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाणे महानगरलिकेच्या उर्दू  शिक्षकांचे देखील या मोहिमेस सहकार्य लाभले. स्वीप पथकातील राजेंद्र देसाई यांच्यासह अन्य सहकारी सहभागी झाले होते.

०००