महसूल सप्ताहानिमित्त माजी सैनिक, विधवा व त्यांच्या पाल्यांचा विशेष सत्कार

मुंबई, दि.८ : महसूल सप्ताहानिमित्त लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य इत्यादींचा विशेष सत्कार समारंभ १० ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार असून मुंबई शहरातील माजी सैनिक अथवा कुटुंबियांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शालांत परीक्षा (इ १० वी), उच्च माध्यमिक परीक्षा (इ. १२ वी) परीक्षेमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होवून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांचे पाल्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळाला आहे, तसेच राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इ. क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य इत्यादींचा महसूल सप्ताह निमित्त विशेष सत्कार समारंभ १० ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

पात्रता धारक लाभार्थीनी त्वरित या कार्यालयीन दूरध्वनी क्र. ०२२-२२७००४०४/९८६९४८९३७५ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ