महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईः दि. 9 :  महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे आदी उपस्थित होते.

000