महाराष्ट्रदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण  

नागपूर, दि. 1 : येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस बँडपथकाने राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे सादरीकरण केले. पथसंचलनात सहभागी होणाऱ्या विविध पथकांचे त्यांनी निरीक्षण केले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या नागपूर स्थित विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी-कर्मचारी  यावेळी उपस्थित होते.

000