महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारीउपजिल्हाधिकारी एकनाथ नवलेजिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकस्वतंत्र सेनानीनागरिकअधिकारीकर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी व मुंबई जिल्हा, महिला कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

0000

सुनील डहाळे/उपसंपादक/