महाराष्ट्र दिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक कुटुंबिय, जेष्ठ नागरिक अन्य मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर सोबत परेडचे निरीक्षण केले. तसेच पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.