महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजारोहण

मुंबईदि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनमुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. गोऱ्हे तसेच महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळेसह सचिव मेघना तळेकरशिवदर्शन साठ्येउप सचिव राजेश तारवीउमेश शिंदेउप सचिव (विधी) सायली कांबळीअवर सचिव विजय कोमटवारसंचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्रजनसंपर्क अधिकारीनिलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.