मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात. एप्रिल महिन्यामध्ये ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १९ एप्रिल रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष, १७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गौरव, २४ एप्रिल रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी ४ वाजता काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६९० तिकीटांना एकूण ६ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष तिकीट क्रमांक GS-02/9359 या किशोर लॉटरी सेंटर, सांगली यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास २२ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण १ हजार ४९९ तिकीटांना एकूण २९ लाख १० हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-25/1470 या कोमल एजन्सी, औरंगाबाद यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २३ तिकीटांना एकूण ४२ लाख ९९ हजार रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण ८७६ तिकीटांना एकूण ६ लाख ११ हजार ७०० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ७४ तिकीटांना एकूण २ लाख ३१ हजार ७५० रुपये किंमतीचे बक्षिस जाहीर झाले आहेत.
याशिवाय एप्रिल २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६ हजार ३१५ जणांना ८५ लाख ७१ हजार ७०० रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजारावरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. १० हजार रुपयाच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे संबंधित कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
0000
वंदना थोरात/विसंअ/