महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात

रायगड (जिमाका)दि.1 :- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी झालेल्या संचलनात रायगड जिल्हा पोलीस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलीस दल,  महाराष्ट्र अग्निशमन सेवा  वाहतूक पोलीस दल, पोलीस ब्रास बॅण्ड पथक, होमगार्ड पथक,श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय 108 रुग्णवाहिका आदी सहभाग घेतला. संचालनाचे नेतृत्व परेड कमांडर श्री.शैलेश बाबुराव काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, रोहा विभाग दुय्यम परेड कमांडर पोलीस उप निरीक्षक, श्री. शिवराज शामराव खराडे, क्यूआरटी पथक यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000